बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे छत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा चौथा दुग्धाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी दुग्धाभिषेक सोहळ्याचा मान प्रगतशील शेतकरी चांगदेव तांबे यांना देण्यात आला.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून हभप सुखदेव महाराज मुंगसे, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, मधुदेवा तांदळे, गंगाधर कदम, बन्सी गोयकर, शिवनेरी प्रतिष्ठानचे एकनाथ फुलारी, काकडे पाटील, नामदेव वांढेकर, बाळू मुंगसे, पावन गणपती देवस्थानचे अशोक मुंगसे, मोहन टाके, सोन्याबापू कुटे, सुभाष मुंगसे आदी ग्रामस्थ, शिवभक्त व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



