प्रधानमंत्री आवास योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा: सरपंच चंद्रकांत मुंगसे

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत देडगाव येथील ८८ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून त्या लाभार्थ्यांनी तातडीने बांधकाम पूर्ण करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (टप्पा दोन) अंतर्गत ग्रामपंचायत देडगावच्या वतीने ८८ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय […]

सविस्तर वाचा

चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलचा शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल १०० टक्के

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कलासंचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेत चाईल्ड करिअर  इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. या स्पर्धेत सलाबतपूर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सदर परीक्षेत पलक श्रीकृष्ण कुऱ्हाडे, पूर्वा पद्माकर मते, तमन्ना समीर पठाण या विद्यार्थिनींनी यश संपादन […]

सविस्तर वाचा

तेलकुडगावातील शेंडगे दांपत्याने केली नवसपूर्ती

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील आमदार व्हावेत म्हणून चांदीचा घोडा चैतन्य नागनाथ महाराजांना वाहण्याचा नवस तेलकुडगाव येथील सोपानराव शेंडगे व अनिता शेंडगे यांनी केला होता. या नवसाची पूर्ती आमदार लंघे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. तेलकुडगाव ग्रामपंचायतच्या ४२ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व आमदार लंघे पाटील यांचा नागरी सत्कार समारंभ प्रसंगी […]

सविस्तर वाचा

मोठी बातमी! मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग अन् प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर

जनशक्ती (वृत्तसेवा)-  भारतासाठी विविध क्रीडा प्रकारात 2024 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आज क्रीडा मंत्रालयाने पुरस्कार जाहीर केले आहेत. चेस वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 मेडल मिळवून देणाऱ्या मनू भाकर यासह एकूण चौघांना यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात या […]

सविस्तर वाचा

नवीन वर्षाचं स्वागत होणार कडाक्याच्या थंडीने 

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे. तर कुठं ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, काही तासातच नवीन वर्ष 2025 ला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. दरम्यान, या नवीन वर्षात नेमकं वातावरण कसं असेल, याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. नवीन वर्ष जानेवारी 2025 चे स्वागत […]

सविस्तर वाचा

अखेर वाल्मिक कराड यांचे आत्मसमर्पण! पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजेरी

जनशक्ती (वृत्तसेवा)- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांनी आज पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्पण केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव होते. वाल्मीक कराड यांचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. यावेळी वाल्मिक कराड म्हणाले, […]

सविस्तर वाचा

राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर; कोणाला कोणते खाते? वाचा सविस्तर…

जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या आठ दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्‍यांना खातेवाटप जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालं […]

सविस्तर वाचा

महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री होणार?; एकनाथ शिंदे यांनी मांडली भूमिका

जनशक्ती (वृत्तसेवा)- एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जो निर्णय घेतील, भाजप जो निर्णय घेईल तो एकनाथ शिंदे म्हणून आणि शिवसेना म्हणून मान्य असेल असं सांगितलं. बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं ते स्वप्न मोदी आणि शाहांनी पूर्ण केलं, त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय होईल, तो […]

सविस्तर वाचा

“शेतकरी, कष्टकरी, दीनदलित, वंचितांचे प्रश्न सोडविण्याची धमक आमदार गडाखांमध्येच”

जनशक्ती (वृत्तसेवा)- तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, दीनदलित, वंचितांचे प्रश्न सोडविण्याची धमक आमदार शंकरराव गडाखांमध्येच असल्याचे प्रतिपादन माजी खासदार ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी केले. विधानसभा निवडणुकीसाठी नेवासाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांची उमेदवारी महाविकास आघाडीने जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचार नियोजनासाठी सोनई येथील मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी […]

सविस्तर वाचा

अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न व्हावा: सुनिलगिरीजी महाराज

कुकाणा (प्रतिनिधी) – कोणताही धर्म हिंसेची शिकवण देत नाही. प्रत्येक धर्माच्या प्रार्थनेमध्ये विज्ञान धरलेले आहे. परंतु आज समाजात मोबाईलवर कोणीही काहीही पोस्ट टाकतात आणि त्याचा दुष्परिणाम होऊन लोकांमध्ये वैरभाव निर्माण होतो. हे सर्व आता थांबले पाहिजे व समाजात, देशात शांतता निर्माण झाली पाहिजे. आध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न व्हावा, असे प्रतिपादन श्रीराम साधना […]

सविस्तर वाचा