खासदार भाऊसाहेब वाकचौरे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सामाजिक, धार्मिक कार्यांचा गौरव म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित केल्याची माहिती श्री संत रोहिदास ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी दिली.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रशासकीय सेवेत असताना तसेच शिर्डी देवस्थानच्या प्रशासकीय पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी  सामाजिक व धार्मिक क्षेत्रात प्रभावी कार्य केले. तसेच आपल्या लोकसभा सदस्यत्वपदाच्या कार्यकाळात समाजाच्या सर्व घटकातील नागरिकांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी भरीव असे कार्य केले आहे. खासदार वाकचौरे यांनी त्यांच्या संपूर्ण जिवनात सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कामाचा गौरव करण्याच्या हेतुने श्री संत रोहिदास ग्रामविकास प्रतिष्ठानने त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी चेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपप्रमुख हरिभाऊ शेळके, माधव ननावरे, मालोजीराव गटकळ, उपप्रमुख रामानंद मुंगसे, देवस्थानचे अध्यक्ष हनुमंतराव गटकळ, मार्केट कमिटी सदस्य अरुण सावंत, विधानसभा संघटक पंकज लांबहाते, मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, चेअरमन काकासाहेब काळे, पत्रकार इंनुस पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.