तेलकुडगाव सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी घोडेचोर तर व्हा. चेअरमनपदी हरिश्चंद्र काळे बिनविरोध

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, शिक्षणमहर्षी साहेबराव घाडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी रामचंद्र घोडेचोर तर व्हा. चेअरमनपदी हरिश्चंद्र हनुमंत काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी सूचक अशोक गोरक्षनाथ काळे तर अनुमोदक दिगंबर बारीकराव काळे व व्हा. चेअरमन पदासाठी सूचक अरुण भिवसेन घाडगे तर अनुमोदक काकासाहेब बाजीराव काळे होते.

या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी वाय एल नर्सिंगपूरकर यांनी काम बघितले. यावेळी संचालक अ‍ॅड. रणजीत घोडेचोर, चंद्रकांत म्हस्के, भाऊसाहेब शेंडगे, कडूबाळ तेलधुणे, आदिका काकासाहेब घोडेचोर, राधाबाई म्हतारदेव काळे, दयाधन गटकळ, भानुदास गटकळ, भैय्यासाहेब कुलकर्णी, त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, माजी सरपंच गोरक्षनाथ घोडेचोर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारत काळे, महेश काळे, काशिनाथ गटकळ, मुरलीधर काळे ,साहेबराव घोडेचोर, रमेश काळे, गोवर्धन काळे ,अशोक शेटे, अरविंद घाडगे, हरिभाऊ गटकळ, रेवनाथ काळे, रमेश घोडेचोर, तात्यासाहेब गायकवाड, दत्तात्रय घोडेचोर ,महादेव घोडेचोर ,बाळासाहेब घोडेचोर, भागचंद गटकळ, नामदेव घोडेचोर, काशिनाथ घोडेचोर, विठ्ठल काळे, बबन काळे, तात्यासाहेब काळे, नवनाथ काळे, मधुकर घाडगे सर ,एकनाथ काळे, सुभाष माने, दीपक घाडगे, शिवनाथ घोडेचोर ,अशोक घोडेचोर ,देविदास काळे, बाबासाहेब घाडगे ,मनोहर शेटे, रमेश परभने, सुदर्शन काळे , अण्णासाहेब घाडगे, आप्पासाहेब भगत, आनंद घाडगे, संभाजी काळे, विजय गुंजाळ, गोरख घाडगे, साईनाथ घोडेचोर, अरुण काळे, सूर्यभान घोडेचोर, दत्तात्रय काळे, बी.के सर, दिनकर साळवे, लक्ष्मण कर्डिले, भारत घोडेचोर, बाळासाहेब गायकवाड, ढकाजी घाडगे, कुंडलिक शेटे, भरत शेटे, नारायण काळे, संदीप काळे ,दादासाहेब काळे ,तुकाराम काळे ,बाळासाहेब माने ,ज्ञानेश्वर घोडेचोर ,भारत काळे ,रावसाहेब साळुंखे, म्हातारदेव काळे, चंद्रकांत गटकळ, रवींद्र काळे, संतोष काळे, रामचंद्र काळे, महेश घोडेचोर ,लाला शेंडगे ,किशोर घोडेचोर ,संभाजी घोडेचोर, नाथा घोडेचोर ,विलास काळे, जयराम घोडेचोर, संतोष सरोदे ,आजिनाथ घोडेचोर, संदीप काळे, संस्थेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. संस्थेचे सचिव बी.पी.पाटील, क्लार्क एस.एम. वाबळे, एस. बी. काळे, डी. के.काळे, के. बी. उनवणे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा विविध संघटनेच्या शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, शिक्षणमहर्षी साहेबराव घाडगे पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.