बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील तिसगाव अर्बन शाखेचे नामांतर श्री. संत माऊली मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड असे करण्यात आले आहे. या रूपांतरीत सोहळ्याचे उद्घाटन ज्ञानेश्वर संस्थान नेवासाचे मठाधिपती हभप देविदास महाराज म्हस्के, श्रीराम साधना आश्रमचे मठाधिपती महंत सुनीलगिरी महाराज व हभप नवनाथ महाराज घाडगे यांच्या शुभहस्ते पार पडले. यानंतर हनुमान मंदिराच्या सभामंडपात १०१ ज्येष्ठ नागरिकांचा व ठेवीदारांचा सन्मानचिन्ह व शाल पुष्प देऊन संस्थेच्या व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या सोहळ्याप्रसंगी संस्थेचे संस्थापक सुनील शिरसाट यांनी संस्थेची माहिती देत नवनवीन सुविधा कशा देता येईल, यासाठी संस्था प्रयत्नशिल असल्याचे सांगितले. संस्था सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक या कार्यात अग्रेसर असून संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात येतात.
संस्थेचा कार्यभार जिल्हाभर असून राज्यात आपल्या सहकार्याने संस्था उभारली, मला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे, या शब्दात आपले प्रास्ताविक केले. महंत सुनीलगिरी महाराज, महंत देविदास महाराज, हभप नवनाथ महाराज घाडगे व शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या नामकरण सोहळ्यास चेअरमन शिवाजी घोडेचोर, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव काळे, युवा नेते महेश काळे, पंचायत सदस्य नामदेव घोडेचोर, सरपंच सतीश काळे, अशोक शेटे, भाऊजी कासार, श्रीकृष्ण घाडगे ,मुरलीधर काळे, चांगदेव घोडेचोर, भिवसेन दादा घाडगे, रमेश काळे, मालोजी गटकळ, हरिश्चंद्र काळे ,सुधाकर राजहंस, भैय्याकाका कुलकर्णी, भाऊ घाडगे ,चेअरमन लक्ष्मण काळे, नवनाथ काळे, काशिनाथ घोडेचोर,आबासाहेब काळे , सोमनाथ घोडेचोर, एकनाथ महाराज घोडचोर, काकासाहेब काळे, संतोष सरोदे,आत्माराम घोडेचोर, कांतीलाल काळे, सुदाम काळे, डॉक्टर माणिक घोडेचोर,
भाऊसाहेब काळे आदी ग्रामस्थ व संस्थेचे खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मिसाळ यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र म्हस्के यांनी मानले.
