आमदार गडाख यांच्या निधीतून तेलकुडगावातील रस्त्याचे मजबुतीकरण

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आमदार शंकरराव गडाख यांच्या निधीतून तेलकुडगाव- हनुमान नगर- गटकळ- गायकवाड वस्ती- देवीचे रोडचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्याची खूप दुरवस्था झाली होती. रस्त्याच्या बाजूची काटेरी झाडे वाढली होती, तसेच रस्त्यात खड्डे पडले होते.
त्यामुळे मेजर अर्जुन गायकवाड, भानुदास गटकळ, बाबुराव काळे आमदार, हरिभाऊ काळे, दीपक घाडगे, ज्ञानेश्वर गायकवाड, देविदास गायकवाड, काकासाहेब काळे, पांडुरंग काळे, नवनाथ काळे, राजू गटकळ, विनोद गटकळ, विजय गुंजाळ, बबन काळे, बाबासाहेब गायकवाड एकनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर काळे, बाळू काळे आदी गावकऱ्यांनी या रस्त्याची समस्या माजी सभापती सुनीताताई गडाख यांच्या निदर्शनास आणून दिली. रस्त्याची दुरवस्था झाल्याने शाळेत जाणाऱ्या मुलांची गैरसोय होत होती. तसेच गावकऱ्यांचे हाल होत होते.
गावकऱ्यांनी मागणी केल्यानंतर माजी सभापती सुनीताताई गडाख यांनी आमदार शंकरराव गडाख यांच्या निधीतून याबरस्त्याचे मुरमीकरण व मजबुतीकरणाचे काम त्वरित चालू केले. रस्त्याच्या कडेचे सर्व काटेरी झाडे काढून रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे या परिसरातील शाळेतील विद्यार्थी तसेच नागरिकांनी आमदार गडाख यांचे आभार व्यक्त केले आहे. याकामी मेजर अर्जुन गायकवाड, भानुदास गटकळ, बाबुराव काळे, दीपक घाडगे, हरिभाऊ काळे यांनी परिश्रम घेतले.