बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी भानुदास यादवराव गटकळ व भैय्यासाहेब कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी दरवर्षी रोटेशनप्रमाणे नूतन चेअरमन शिवाजी रामचंद्र घोडेचोर व व्हा. चेअरमन हरिश्चंद्र हनुमंत काळे यांची प्रथमता निवड करण्यात आली. त्यानंतर सर्व संचालक, सभासदाच्या उपस्थितीत भानुदास गटकळ व भैय्यासाहेब कुलकर्णी यांची सर्वांमध्ये स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालकांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, मा. सरपंच भारत काळे, मा. चेअरमन काकासाहेब काळे ,युवा नेते महेश काळे, विलासराव काळे, मा. सरपंच गोरक्षनाथ घोडेचोर, मालोजीराव गटकळ, नामदेवराव घोडेचोर, गोवर्धन काळे, तसेच सोसायटीचे संचालक अरुण घाडगे ,रणजीत घोडेचोर, चंद्रकांत म्हस्के, दिगंबर काळे, अशोक काळे ,रेवन्नाथ काळे, भाऊसाहेब शेंडगे, कडूबाळ तेलधुणे, सौ. आदीका काकासाहेब घोडेचोर, सौ. राधाबाई म्हातारदेव काळे, दयाधन गटकळ आदी सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीसाठी सोसायटीचे कर्मचारी सचिव बी.पी पाटील, क्लार्क एस बी काळे, डी के काळे, के बी उनवणे यांनी प्रशासकीय काम पाहिले. बालाजी देवस्थानचे विश्वस्त व नूतन संचालक भानुदास गटकळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
