शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र बोरुडे यांची निवड

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फत्तेपूर येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र विजय बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नेवासा तालुक्यातील फत्तेपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीची बैठक सरपंच निलोफर बाबाभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते राजेंद्र बोरुडे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपद निवडीची सूचना अण्णासाहेब श्रीधर गायकवाड यांनी मांडली. या सूचनेला सर्वांनी मान्यता दिली. तर उपाध्यक्षपदी नम्रता अण्णासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली. या बैठकीला उपसरपंच अनिता दत्तात्रय गवते, अंजली दिगंबर फरताळे (ग्रामपंचायत सदस्य), राजू नाथा शेलार, सुनिता रामदास खुणे, कुमार गायकवाड, लजिना राजू शेख, मुख्याध्यापक भुसारी मॅडम , गवळी सर , आहेर मॅडम उपस्थित होते.बराजेंद्र बोरुडे यांच्या निवडीबद्दल बाबाभाई शेख, पोलीस पाटील शिवाजीराव आसणे , तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष साईनाथ बनसोडे , कदीरभाई शेख , सिकंदरशेख सर ‌, प्रकाश गायकवाड सर, युसुफभाई शेख, बाबासाहेब मगर, आशिष गायकवाड, राजू शेख, अमोल बोरुडे, हरिभाऊ माळी,(ग्रामपंचायत सदस्य) ,बबन गायकवाड (ग्रामपंचायत सदस्य), दत्तात्रय गवते ,संतोष गवते ,महेश गिरी, शिवाजी काते ,अमोल मगर ,वसंत बोरुडे ,छत्रपती बोरुडे ,श्रीपती गायकवाड, दादाप्पा बोरुडे , प्रथमेश गायकवाड,रुपेश गायकवाड,सार्थक गायकवाड ,बाबासाहेब शेलार ,आजिनाथ माळी, संदीप शेजुळ ,राजू शिंदे ,पिंटू शिंदे ,राहुल कोकरे ,दिवाकर गायकवाड, बाळासाहेब पाचरणे, देवराव गायकवाड, बापू गायकवाड, सतिष गायकवाड, सोमेश्वर लवांडे, यांनी राजेंद्र बोरुडे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.