माका महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून तृतीय व द्वितीय वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम उत्कृष्टरित्या पार पाडले. विद्यार्थ्यांनी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भूमिका उत्कृष्टरित्या पार पाडली. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रतीक्षा लोंढे, प्रियंका भानगुडे, प्रा. प्राजक्ता गायके, प्रा. मंदार कुलकर्णी व डॉ. अमोल दहातोंडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.   अध्यक्षीय भाषणात डॉ. भानुदास चोपडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा. आपणही आपल्या शिक्षकांचा आदर राखावा. शिक्षक सांगतील त्या दिशेने आपले ध्येय निश्चित करावे. ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने अविरत परिश्रम घ्यावे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्राध्यापक व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अश्विनी लोंढे हिने केले. तर अध्यक्षीय सूचना प्रतिक्षा औटी हिने मांडली. अनुमोदन आरती कोकाटे हिने दिले. सूत्रसंचालन अश्विनी बोरूडेने केले. आभार प्रदर्शन वैष्णवी लोंढे ने केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. भक्ती  बजांगे प्रा. शाहबाज सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.