नागेबाबा सुरक्षा कवच अंतर्गत हॉस्पिटलचा खर्च खातेदाराला प्रदान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट शाखेचे सभासद खातेदार बारकू कुंडलिक पळसकर यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यांनी नागेबाबा सुरक्षा कवच अंतर्गत विमा घेतला होता. आज त्यांना हॉस्पिटलचा खर्च त्यांच्या खाती जमा करण्यात आला.श्री  संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपल्या परिवारातील घटक आहे, याचा विचार करून संस्थेतील सभासदांसाठी नागेबाबा सुरक्षा कवच योजना चालू केली आहे. यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसास दहा लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच अपघात झाल्यास पाच लाख रुपयेपर्यंत हॉस्पिटल खर्च देण्यात येतो. त्याप्रमाणे बारकू पळसकर यांना हॉस्पिटलचा खर्च देण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी माजी सरपंच बाजीराव मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, पावन गणपती देवस्थानचे विश्वस्त अशोक मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, मुरलीधर दहातोंडे सर, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुनील मुथ्था, रामभाऊ कुटे, हरिभाऊ म्हस्के, आदिनाथ पुंड, शिवाजी तांबे, बन्सी वांढेकर, सोन्याबापू मुंगसे, दत्तात्रय तांबे, बन्सी मुंगसे, बाबासाहेब तांबे, आसाराम मुंगसे, मुरलीधर मुंगसे, बन्सी पळसकर, जालिंदर वांढेकर, गंगाधर तांबे, गिरजू गोयकर, रामदास एडके, मच्छिंद्र मुंगसे, राजू गायकवाड, हरिभाऊ पळसकर, संजय मुंगसे, नारायण मुंगसे, बाळासाहेब वाढेकर, श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटचे डेव्हलपमेंट ऑफिसर नांदे साहेब, शाखा अधिकारी पांडुरंग एडके साहेब, राऊत साहेब, तिडके साहेब आदी सभासद, खातेदार व ग्रामस्थ उपस्थित होते.