ॲड. शंकर चव्हाण परळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता ? चर्चेला आलं उधाण

राजकीय

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मिडीयावर ॲड. शंकर चव्हाण यंदा विधानसभेची निवडणूक लढणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव ही ॲड. शंकर चव्हाण यांची जन्मभूमी आहे व अंबाजोगाई व परळी तालुका त्यांची कर्मभूमी आहे. ॲड. शंकर चव्हाण यांची राजकीय व सामाजिक कारकिर्द अंबाजोगाई तालुक्यासह परळी तालुक्यात अधिकाधिक आहे. त्यामुळे ते परळी मतदारसंघातून निवडणूक लढतील अशी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्‍यांच्या राजकीय व सामाजिक कार्यामुळे संपूर्ण बीड जिल्हा त्यांना गतिशील विचार व सकारात्मक धोरण असणारा युवा नेता म्हणून चांगलाच आळखतो. स्वच्छ प्रतिमेचा व सर्वसामान्यांच्या हक्काचा माणूस म्हणून त्यांची संपूर्ण बीड जिल्ह्यात ओळख आहे. दरम्यान, सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमुळे त्यांना जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून सकारात्मक प्रतिसाद असल्याचे व भावी आमदार म्हणून अधिकच पसंती असल्याचे यावरुन दिसून येते. त्यामुळे ॲड. शंकर चव्हाण हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील अशी शक्यता असल्याच्या राजकीय वर्ततुळात चर्चांना उधाण आल्याचं चित्र पहावयास मिळत आहे.  मात्र, त्‍यांनी अदयाप अधिकृतरित्या मतदारसंघ व कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्यामुळे संभ्रम वाढत आहे. येणाऱ्या काळात लवकरच याबाबत निर्णय होईल, अशी माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. ॲड. शंकर चव्हाण यांच्याबद्दल “भावी आमदार”, “नव्या पर्वाचा नवा शिलेदार, “आता बदल हवा, आमदार नवा”, “बदल हवा, तर चेहर नवा” अशा प्रकारची वाक्य हॅशटॅग म्हणून लाखो युवकांच्या स्टेटसला मोठया प्रमाणत पहावयास मिळत आहेत.