बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, माका, पाचुंदा, म ल हिवरा परिसरातील श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान येथे उद्या शनिवारी (ता.१४) सायंकाळी ४:३० ते ६:०० या वेळेत दिव्य ज्योती जागृती संस्थांनचे संस्थापक व संचालक सद्गुरु सर्वश्री आशुतोष महाराजजी यांचे शिष्य श्री स्वामी अमोघानंदजी यांच्या दिव्य वाणीतून श्री गणेश उत्सवानिमित्त अध्यात्मिक प्रवचन सोहळ्याचे आयोजन केले आह. तरी सर्व भाविक-भक्तांनी या विशेष प्रवचन सोहळ्यास उपस्थित राहून शाश्वत भक्तीचा महिमा श्रवण करावा, ही विनंती. श्रीस्वामी अमोघानंदजी यांच्या दिव्य प्रवचन सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
