देडगाव सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी गाथामूर्ती हभप सुखदेव महाराज मुंगसे होते. यावेळी सचिव रामा तांबे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून सभासदापुढे सोसायटीचा ताळेबंद मांडला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास तांबे म्हणाले, या सोसायटीचे खेळते भाग- भांडवल 2.5 कोटीचे असून संस्थेची वार्षिक उलाढाल 26 कोटीची आहे. ही संस्था आपली सर्वांची असून सर्वांनी वेळेवर कर्ज भरावे. यावेळी रघुनाथ कुटे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
वार्षिक सभेसाठी सोसायटीचे उपाध्यक्ष रामनाथ गोयकर, संचालक योसेफ हिवाळे, माजी सरपंच रामेश्वर गोयकर, संदीप कुटे, जनार्धन मुंगसे, सागर बनसोडे, उपसरपंच महादेव पुंड, राजाराम मुंगसे, माजी चेअरमन महेश कदम, काशिनाथ टकले, मुरलीधर मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, संजय मुंगसे , हवालदार पठाण, पोपट देशमुख, शिवाजी कोकरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मुंगसे, अंबादास तांबे, रंगनाथ कोकरे, संजय गोयकर आदी संस्थेचे खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेचे कर्मचारी गोरख देवकाते, गणेश सुसे, हरिभाऊ गोफने, राजेंद्र अंबाडे यांनी या सभेचे उत्कृष्ट आयोजन केले. संस्थेच्या वतीने सभासदांना मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युनूस पठाण यांनी मानले.