अखेर ठरलं ! ॲड. शंकर चव्हाण परळी मतदारसंघातूनच विधानसभा लढवणार

राजकीय

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- अनेक दिवसांपासून सोशल मिडीयावर चर्चेत असलेले ॲड. शंकर चव्हाण यांच्या विधानसभा मतदार संघाबाबतचा तिढा अखेर सुटला असून ॲड. शंकर चव्हाण यांचं परळी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचं अखेर ठरलं आहे. परळी विधानसभा मतदार संघातूनच निवडणूक लढणार यावर शिक्कामोर्तब झाला असल्याचं एका प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट झालं आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून २०२४ ची आमदारकी संपूर्ण ताकतीनिशी लढवणार असल्याचं त्यात जाहीर करण्यात आलं आहे. त्या प्रसिद्ध पत्रकामध्ये तरुणांना रोजगार, परळीला आयटी हब व गावांना स्मार्ट विलेज बनवण्याचा निर्धार तसेच संपूर्ण मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून टाकणार असल्याचंही त्यात नमूद केले आहे. येणाऱ्या काळामध्ये परळीच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा आयटी हब करण्याचा व येथील तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प ॲड. शंकर चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठवाडा हा रोजगाराच्या संधी पासून वंचित राहिला आहे. देशाच्या नकाशावर असणारा बीड जिल्हा हा कायम उसतोड कामगारांचा व मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख राहिली आहे. पण आता ॲड. शंकर चव्हाण यांच्या विकासात्मक धोरण या माध्यमातून ही ओळख पुसली जाणार आहे. यापुढे रोजगार करण्यासाठी मेट्रोसिटी मध्ये तरुणांना संधी शोधत जावे लागणार नाही स्थानिक तसेच मराठवाडयातील तरुणांना इतरत्र कुठेही रोजगारासाठी जावे लगणार नाही असे प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून ॲड. शंकर चव्हाण यांनी परळी विधानसभेच्या मतदारसंघातील जनतेला आश्वासित केल्याचे दिसून येते. शेतमालालाही हमीभाव मिळत नसल्याने बळीराजाला नेहमीच आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. बळीराजाच्या अशा प्रकारच्या गंभीर प्रश्नावर सुध्दा ॲड शंकर चव्हाण हे विधीमंडळात आवाज उठवणार असल्याचं त्या प्रसिध्दी पत्रकामध्ये नमूद आहे. तसेच परळी विधानसभा मतदारसंघातील तरुण वर्गामधून ॲड. शंकर चव्हाण यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक पसंती मिळत असल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे.