लमनबाबा देवस्थान व रेणुका माता देवस्थान येथील सभामंडपाचे लोकार्पण

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री क्षेत्र लमान बाबा देवस्थान लाल गेट व रेणुका माता मंदिर देवी वस्ती येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
लमान बाबा देवस्थानसाठी अकरा लाख रुपये किमतीचा सभामंडप व रेणुका माता देवस्थान देवी वस्तीसाठी पंधरा लाख रुपये किमतीचा सभामंडप आमदार शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर होऊन काम पूर्ण झाले. त्यामुळे ग्रामस्थांच्या आग्रहाखातर या सभामंडपाचे लोकार्पण आमदार शंकरराव गडाख व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
या सभामंडपाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी उपसभापती कारभारी चेडे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम, माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, सूर्यभान सोनवणे, भाऊसाहेब, जनार्धन तांबे, भानुदास गटकळ,नारायण खरात, मोहनराव मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मुंगसे, युवा नेते श्रीकांत हिवाळे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे, नारायण मुंगसे, बंडू बावधनकर, मधुकर वांढेकर, जालिंदर कदम सर, राजेंद्र कदम, वसंत मुंगसे, महेश चेडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर लमान बाबा मित्र मंडळ व रेणुका माता मित्र मंडळ यांच्यावतीने आमदार शंकरराव गडाख यांचा सन्मान करण्यात आला. देवस्थानला सभामंडपाच्या माध्यमातून निधी दिल्याने देडगाव परिसरातून आमदार शंकराव गडाख यांचे अभिनंदन होत आहे.