बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, माका , पाचुंदा, म ल हिवरा, तेलकुडगाव या परिसरातील पावन महागणपती देवस्थान येथे सालाबादप्रमाणे 26 वर्षापासून उत्सव साजरा केला जातो. गुरुवर्य भास्करगिरी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दहा दिवस उत्सव सोहळ्यात हजारो भाविकासमवेत महाआरती नामांकित वारकऱ्यांची भजनी, ह भ प प्रदीप महाराज वाघमोडे यांची कीर्तनरुपी सेवा, तसेच स्वामी अमोघनंदजी यांची प्रवचनरुपी सेवा व अनेक धार्मिक कार्यक्रमांनी हा उत्सव पार पडला.
यानिमित्ताने शेवटच्या दिवशी तारकेश्वर गडाचे महंत हभप आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनात गणरायाच्या प्रबोधनाने हरी नामाच्या गजरात व दहीहंडीच्या काल्यात परिसर गजबाजून गेला होता. यावेळी आदिनाथ महाराज बोलताना म्हणाले, ही गणपतीची तेजस्विनी मूर्ती असून हे गणपती बाप्पा चेतना,ऊर्जा, व विवेक बुद्धी देणारी देवता आहे. म्हणून या परिसरात नंदनवन झाले आहे. सर्वांनी या देवतेची मनोभावे पूजा करा. तुम्हाला सुख, समाधान मिळेल, असे अनेक विषयावर प्रबोधन केले.
तर ज्ञानदेव रक्ताटे, नवनाथ महाराज तांबे, अँड. कृणाल शिंदे, विजयराव चेडे, हभप पांडुरंग महाराज रक्ताटे, दिनेशशेठ गुगळे, विश्वास हिवाळे, सोपान मुंगसे, अशोक चोपडे, मुक्ता चंद ,पोपाट वाघमोडे, सोपान पांढरे ,मळू वाघमोडे, गोरक्षनाथ मुंगसे, ज्ञानदेव तिडके, सारंगधर तिडके, लक्ष्मण मुंगसे सर , दादा वाघमोडे ,भिवाजी वाघमोडे, बन्सी मुंगसे ,विठ्ठल कदम, संपत मुंगसे, मारुती दारकुंडे, वाघमोडे मेजर, लहानु कांदे चेअरमन, गणेश बनसोडे, हरीभाऊ देवकाते, पंढरीनाथ बनसोडे, शिवाजी बनसोडे चेअरमन, मेजर नवनाथ कुटे, मेजर लोखंडे , विलासराव मुंगसे, शिवाजीराव कादे, लाल बहादूर कोकरे या अन्नदात्यांनी दररोजच्या पंक्तीचे आयोजन केले होते. सरपंच चंद्रकांत मुंगसे ,चेअरमन बाबासाहेब मुंगसे, कांदा व्यापारी गणेश मोटे यांच्या वतीने काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अन्नदाते व विशेष योगदान देणारे भाविक यांचा देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला.
काल्याच्या कीर्तन सोहळ्यासाठी माजी सभापती भगवानराव गंगावणे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, माजी सभापती कारभारी चेडे, दिनकरराव गुगळे, हभप सदाशिव महाराज पुंड, हभप राजाराम महाराज मुंगसे, दत्ता पाटील मुंगसे, माऊली मल्टीस्टेटचे संस्थापक सुनील शिरसाठ, प्रा. मुरलीधर दहातोंडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे संस्थापक सागर बनसोडे सर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष संभाजी मुंगसे, तज्ञ विश्वस्त अशोकराव मुंगसे ,बन्सी आप्पा मुंगसे ,आदिनाथ कुटे, भाऊसाहेब मुंगसे ,नवनाथ रक्ताटे, देवराव टांगळ ,देविदास रक्ताटे , विश्वास हिवाळे ,गणेश बनसोडे ,संजय मुंगसे आदी विश्वस्त यांनी दहा दिवस अथक परिश्रम घेत उत्सवाचे भव्य आयोजन केले. देडगाव, पाचुंदा ,माका, मलहिवरा येथील भजनी मंडळांनी दहा दिवस भजनाचे उत्तम आयोजन केले होते.
हजारो भाविकांनी काल्याचा महाप्रसाद मोठ्या आनंदाने घेतल. तर या प्रसादाचे वाटप शिवनेरी ग्रुपचे अध्यक्ष एकनाथ फुलारी व सर्व सदस्यांनी केले. यावेळी जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
