श्री संत माऊली संस्थेकडून खातेदार व ठेवीदारांसाठी विविध आकर्षक योजना 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- संतांच्या प्रेरणेतून, त्यांच्या विचारातून निर्माण झालेल्या श्री संत माऊली संस्थेने खातेदार व ठेवीदारांसाठी विविध आकर्षक योजना सुरु केल्या आहेत. ठेवींवर आकर्षक व्याजदर आणि ठेवींची संपूर्ण सुरक्षा देणारी संस्था म्हणून श्री संत माऊली म. को. ऑप. क्रे. सो. ली. ओळख आहे. यामध्ये लाभदायी पेन्शन ठेव योजनेमध्ये 1 लाख 13 महिन्यांसाठी आणि मिळवा दरमहा रुपये 950. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, हभप यांना मिळतील दरमहा रुपये 1050. एका वर्षानंतर मुद्दल रक्कम परत मिळेल. विशेष माऊली ठेव योजनेत भरा रुपये 55 हजार फक्त 15 महिन्यांकरिता आणि मिळवा 65 हजार रुपये. एका वर्षाच्या मुदत ठेवीवर मिळवा 11% व्याजदर. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, हभप यांना 1 टक्का अधिक व्याजदर.अधिक विश्वास व पारदर्शकता म्हणून कोणत्याही मुदत ठेवीचा मुदत अखेर रकमेचा राष्ट्रीयकृत बँकेचा PDC चेक लगेच मिळण्याची आधुनिक सुविधा उपलब्ध आहे.

अत्याधुनिक सोयीसुविधा ,आकर्षक व्याजदर, मोफत मोबाईल बँकिंग ॲप, चेक क्लिअरिंग सुविधा ,मोफत क्यूआर कोड सुविधा, आधार विड्रॉल सुविधा, एटीएम सुविधा, लाईट बिल भरणा सुविधा, विविध विमा योजनेच्या सुविधेसह श्री संत माऊली संस्था 365 दिवस तिसगाव, पाथर्डी, कोरडगाव, ढोरजळगाव, तेलकुडगाव, भातकुडगाव आणि बालाजी देडगाव येथे सर्वांच्या सेवेत कार्यरत आहे. ही संस्था केवळ अर्थिकच नव्हे तर धार्मिक, सामाजिक, अध्यात्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. ग्रामीण भागातील गरजूवंत व गुणवंत मुला मुलींच्या स्वप्नांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने संस्था वेळोवेळी शालेय साहित्य वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत आलेली आहे. विविध विमा योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कार्य, गावातील आदर्श नागरिकांचा सन्मान करणे , सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्य करण्यास श्री संत माऊली नेहमी सद्भावनेने तयार असते. संस्थेचे अर्थसेवे सोबतच सामाजिक व धार्मिक कार्यातील योगदान पाहता संस्थेला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड 2021, ग्रामीण पत्रकार संघ पुरस्कार 2024, रायझिंग स्टार पुरस्कार 2022, छत्रपती संभाजी नगर गौरव पुरस्कार 2024, नवराष्ट्र रत्न पुरस्कार 2024 यासारख्या पुरस्काराचा समावेश आहे. आपल्या सर्वांच्या विश्वास व प्रतिसादामुळे संस्था यशाची नवनवीन शिखरे गाठत आहे आणि आपला हा श्री संत माऊली परिवार दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आमच्या या डिजिटल सुविधांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शिरसाठ यांनी केले आहे.