बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव,पाचुंदा, माका, म.ल. हिवरा परिसरातील पावन महागणपती देवस्थान येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून पंधरा लाख रुपयाच्या सभामंडपाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप प्रदीप महाराज वाघमोडे, सोन्याबापू महाराज कुटे, मारुती दारकुंडे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप सुखदेव महाराज मुंगसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थानचे विश्वस्त अशोक मुंगसे यांनी करत आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे आपल्या मनोगतातून म्हणाले की, सर्वप्रथम माजी मंत्री आमदार शंकराव गडाख यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानतो. आमदार गडाख यांनी दिलेल्या शब्द पाळला व त्यांच्या विशेष प्रयत्नातून पंधरा लाख रुपयांच्या खर्चाच्या कामाचा आज भूमिपूजन सोहळा होत आहे. देडगावात विविध ठिकाणी आमदार गडाख यांनी सभामंडप दिले आहेत. काही सभामंडप पूर्ण झालेले आहेत तर काहीचे काम प्रगतीपथावर चालू आहे. ह्या सर्व सभामंडपाचे काम लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करत त्यांनी आमदार गडाख यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती कारभारी चेडे ,माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, चांगदेव महाराज तांबे, जनार्दन तांबे ,पांडुरंग महाराज रक्ताटे, चेअरमन बाबासाहेब मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मुंगसे, माजी सरपंच दत्ता मुंगसे, शंकरराव गडाख यांचे स्विय सहाय्यक गणेश लोंढे, विकास राजळे, कॉन्ट्रॅक्टर गुळवे, संभाजी कदम, विनायक पंडित, भीमराज मुंगसे, गणेश औटी, सोपान मुंगसे, प्रा. मुरलीधर दहातोंडे, कुटे मेजर, बंडू तांबे, बाळासाहेब कचरू मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते.
या भूमिपूजन सोहळ्याचे देवस्थानचे अध्यक्ष संभाजी मुंगसे, विश्वस्त भाऊसाहेब मुंगसे ,बन्सी मुंगसे, संजय मुंगसे, विश्वास हिवाळे, गणेश बनसोडे ,आदिनाथ कुटे, भाऊराव टांगळ यांनी आयोजन केले.
