तेलकुडगाव ग्रामपंचायततर्फे रेणुकामाता मंदिर व परिसरासाठी मोटरपंप संच सुपुर्द

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे गावाकडे येताना प्रथमदर्शनी असलेल्या रेणुकानगर येथे रेणुकामाता मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर सुरू आहे. रेणुकानगर येथील सर्व नागरिक व जगदंबा माता भक्त यांनी या अगोदर ग्रामपंचायतकडे बोअरवेलची मागणी केली होती.
त्याठिकाणी दोन बोअरवेल देखील ग्रामपंचायतने अगोदर घेतलेले आहेत. नंतर आजरोजी सुरू असलेल्या मंदिर बांधकामासाठी व रेणुकानगर परिसरातील सर्व नागरिकांच्या पाण्याच्या सुविधेसाठी बोअरवेलमध्ये संपूर्ण मोटरसंचची मागणी करण्यात आली. या मागणीनुसार ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामसेवक भाऊसाहेब, यांच्याकडून 15 व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठ्यासाठी तरतूद करून मोटर दिली आहे. यामुळे मंदिर बांधकाम, मंदिर परिसरातील वृक्षांसाठी, परिसरातील नागरिकांची देखील पाण्याची सोय होणार आहे.
रेणुकामाता मंदिर बांधकाम समिती व रेणुकानगर परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने तेलकुडगाव ग्रामपंचायतचे सरपंच सतिशराव काळे, उपसरपंच शरद काळे, मा. सरपंच बालकनाथ काळे, मा. सरपंच सुरेश काळे, उपसरपंच अशोक काळे, उपसरपंच एकनाथ घोडेचोर, मा. उपसरपंच भारत काळे, महेश गटकळ, नामदेव घोडेचोर, संतोष सरोदे, बापू साळवे, ग्रामविकास अधिकारी काळे भाऊसाहेब, सदस्य यांचे आभार मानण्यात आले आहेत.
यावेळी तेलकुडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सतीशराव काळे, चेअरमन शिवाजी घोडेचोर, हनुमान भक्त तुळशीराम काळे भाऊ, प्राध्यापक मधुकरजी घाडगे सर, ह.भ.प नामदेव महाराज घाडगे, कारभारी परभने, साईनाथराव काळे , मुरलीधर काळे आप्पा, रमेश परभणे, ज्ञानेश्वर काळे, बबनतात्या जाधव, नानाभाऊ कावळे, तुकाराम महाराज काळे, श्रीधर कावळे, गणेश कावळे, प्रशांतकाका गुंफेकर, ज्ञानदेव घाडगे, देविदास परभने, संजय घाडगे, अशोकअन्ना घाडगे, अरुण घोडेचोर, रामभाऊ दगडे, मच्छिंद्र घाडगे, बाळासाहेब घाडगे, सचिन परभणे, नानासाहेब काळे, लाला तेलधुणे, संदिप निर्मळ, रमेश घोडेचोर, सारंगधर कावळे, भारस्कर, सरोदे, जगधणे आदी नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.