बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे (लालगेट) लमन बाबा देवस्थान परिसरात मुंगसे परिवाराच्या वतीने भाद्रपदी पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रावणी पोळा मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव देडगाव मधील श्रावणी पोळा साजरा न करता मुंगसे परिवाराच्यावतीने भाद्रपदी पोळा साजरा करण्यात आला.
पारंपारिक पद्धतीने बैलांची मिरवणूक काढण्यात आली
तर फटाक्याच्या आतषबाजी मध्ये व ढोल ताशाच्या गजरात बाराही महिने बळीराजा बरोबर काम करणारा सर्जा राजाची मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. आजच्या दिवशी त्यांना स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून विविध प्रकारची रंगरंगावट व सुशोभीत सजावट करण्यात आली होती. घरोघरी सर्जा राजांचे मनोभावे पूजन करण्यात आले. बैल राजांना पुरणपोळीचा गोड नैवेद्य खाऊ घालण्यात आला. भाऊसाहेब मुंगसे, पांडुरंग मुंगसे, सुंदरदास मुंगसे , अशोक मुंगसे, मोहन मुंगसे , विठ्ठल मुंगसे, राजेन्द्र मुंगसे , भगवान मुंगसे, नवनाथ मुंगसे , तुकाराम मुंगसे, पोपट मुंगसे आदी मान्यवरांनी पोळा उत्साहात साजरा केला.