बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील लाल गेट वस्तीवरील लमानबाबा देवस्थान येथे सभामंडपाचे व मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर असून अनेक भाविक स्वइच्छेने दान देत आहे. तर अजूनही मोठे काम करण्याचा मानस देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त यांनी केला आहे. हे देवस्थान परिसरातील प्रचलित देवस्थान आहे. या देवस्थानचा जिर्णोद्धार करणार आहोत, म्हणून भाविकांनी देणगी स्वरूपात सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. हे देवस्थान देडगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने व लालगेट परिसराच्या कष्टातून उभारण्यात येत आहे.
या देवस्थानसाठी अजूनही कीर्तनासाठी सांस्कृतिक भवन, ज्ञानमंडप, परिसरामध्ये पेविंग ब्लॉक, संरक्षण भिंत, वृक्षारोपण व संत महंतासाठी संतभवन भाविकासाठी बसण्यासाठी बसकर अशा अनेक सुविधा त्या ठिकाणी होणार आहेत. देवस्थानच्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते, अशी माहिती देवस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्तांनी दिली. आत्तापर्यंत ज्या देणगीदाराने या कामासाठी भरीव देणगी दिली आहे, त्यांचे देवस्थानच्या वतीने आभार मानण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या जनावरांचे संरक्षण लमानबाबा करतो व भक्तांनी श्रद्धेने मागितलेली गोष्ट देतो, अशी या देवस्थानची आख्यायिका आहे. देवस्थानच्या कामासाठी मोहन मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मुंगसे, सुभाष मुंगसे, उद्धव मुंगसे, भगवान मुंगसे, पठारे दाजी, बंडू बावधनकर , शिवाजी मुंगसे, संभाजी मुंगसे, सोमनाथ मुंगसे आदी विश्वस्त कष्ट घेत आहेत.
