बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- बालाजी देडगावचे भूमिपुत्र व हनुमान माध्यमिक विद्यालय गोंडेगावचे उपक्रमशील शिक्षक सागर बनसोडे यांना युवा प्रतिष्ठानचा या वर्षीचा शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल बालाजी देडगाव ग्रामस्थ, ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून नागरी सन्मान करण्यात आला.
युवा सामाजिक प्रतिष्ठान दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार प्रदान करते. या वर्षीचा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल युवा शिक्षक रत्न पुरस्कार सागर बनसोडे यांना प्रदान करण्यात आला. म्हणून नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गाथामुर्ती ह.भ.प.सुखदेव महाराज मुंगसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.रेवणनाथ महाराज पाटेकर होते. यावेळी सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, पत्रकार बन्सीभाऊ एडके, सुखदेव महाराज मुंगसे यांनी मनोगत व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सदर सन्मान सोहळा प्रसंगी बन्सी मुंगसे, कारभारी मुंगसे, भाऊसाहेब सावंत, बाळासाहेब मुंगसे, प्रा. राजू बनसोडे, संजय वांढेकर, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य राजू मुंगसे, सोसायटीचे चेअरमन रामदास तांबे, सचिव रामनाथ तांबे,आदिनाथ सुसे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार इंनुस पठाण यांनी मानले.
