बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, पाचुंदा, माका, म ल हिवरा परिसरातील पावन महागणपती देवस्थान येथे 15 लक्ष रुपये खर्चाच्या सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. गणपती मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप प्रदीप महाराज वाघमोडे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त अशोक मुंगसे यांनी केले. यावेळी माजी सभापती भगवानराव गंगावणे, माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे, माका गावचे उपसरपंच अनिल घुले, देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी आपले मनोगत व्यक्त करत दिलेल्या सभा मंडपाच्या कामाबद्दल धन्यवाद व्यक्त करत अभिनंदन केले.
आमदार शंकरराव गडाख यावेळी बोलताना म्हणाले, माझ्या या पाच वर्षाच्या कालावधीत मी अनेक देवस्थानसाठी सभामंडप, पेव्हिंग ब्लॉक, वाॅल कंपाऊंड, रस्ते, विजेचे साधने, पाट पाण्याचे नियोजन व विविध विकासकामे केली आहेत. मला नेवासा तालुका हा विकासाचा तालुका म्हणून नावलौकिक मिळवायचे आहे. मला तुमच्या मतदानरुपी सहकार्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत जनतेने मला खूप प्रेम केले आहे, असेच प्रेम येणाऱ्या काळात माझ्यावर भरभरून प्रेम ठेवा व मला पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याची संधी द्या. पुढील काळात राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान गेवराई येथील सोमनाथ भाऊसाहेब बर्वे व इतर पदाधिकारी राजकुमार उत्तम बर्वे, पोपट मुरलीधर बर्वे ,अजय राजेंद्र बर्वे, करण बर्वे ,संभाजी पुंड, विष्णू राशिनकर, खंडूभाऊ काळे आदींनी आमदार शंकरराव गडाख गटात प्रवेश केला. त्यांचा आमदार शंकराव गडाख यांच्या वतीने सन्मान करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, मुळा साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण आबा पांढरे, मा. सभापती कारभारी चेडे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, माजी चेअरमन संतोष तांबे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मुंगसे, कॉन्ट्रॅक्टर रेपाळे साहेब व बुळे साहेब , बन्सी पाटील मुंगसे, एकनाथराव भुजबळ, पोलीस पाटील किसनराव पाटील, योसेफ हिवाळे, विश्वास हिवाळे ,बबनराव भानगुडे, दामू अण्णा शिंदे, दिलीप शिंदे , अमित रासने, सिताराम रुपनर , बाबासाहेब होंडे साहेब, बाबासाहेब मुंगसे ,रामेश्वर गोयकर, नारायणराव वाघमोडे, दादा एडके, हिरामण फुलारी, महेश चेडे , विकास राजळे ,गणेश लोंढे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, देवस्थानचे अध्यक्ष संभाजी मुंगसे, विश्वस्त भाऊसाहेब मुंगसे ,आदिनाथ कुटे, बन्सीआप्पा मुंगसे , सखाराम होंडे तर देडगाव पाचुंदा म.ल.हिवरा माका परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनूस पठाण यांनी केले तर आभार अॅड. गोकुळ भताने यांनी मानले.