बालाजी देडगाव सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा नागरी सन्मान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन अध्यक्षपदी सागर मनोहर बनसोडे सर तर उपाध्यक्षपदी सुनीता जनार्दन मुंगसे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप सुखदेव महाराज मुंगसे होते तर प्रास्ताविक अशोक मुंगसे यांनी केले. तर सरपंच चंद्रकांत मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, बळीराज्य संघटनेचे संस्थापक मच्छिंद्र मुंगसे यांनी आपले मनोगत व्यक्त करत नूतन पदाधिकाऱ्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्कारास उत्तर म्हणून सागर बनसोडे यांनी ग्रामस्थांचे आभार मानत मला जी काही संधी मिळाली त्याचे निश्चित चांगले काम करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी कायम तत्पर व प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामपंचायत, बालाजी देवस्थान, पावन गणपती देवस्थान, संत रोहिदास देवस्थान व विविध संघटनेच्या, शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, बन्सी पाटील मुंगसे, अशोक पाटील मुंगसे, उपसरपंच महादेव पुंड, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मुंगसे, शरद तांबे, सूर्यभान सोनवणे ,गणपत कोकरे, मुरलीधर मुंगसे ,भानुदास मुंगसे, देवस्थानचे अध्यक्ष संभाजी मुंगसे , हनुमंत फुलारी, संजय मुंगसे, दत्तात्रय कदम , शिवाजी काजळे , शिवाजी बनसोडे, सचिन मुंगसे, विलास मुंगसे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युनूस पठाण यांनी मानले.