जनशक्ती (वृत्तसेवा)- पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील माध्यमिक शिक्षक भारत कांबळे यांच्या सालाबादप्रमाणे कार्तिकी वारीला सुरुवात करण्यात आली आहे. भारत कांबळे मागील १५ वर्षांपासून दिवाळीची सुट्टी लागली की पंढरपूरची कार्तिक वारी नियमितपणे करतात. भारत कांबळे सर श्री कानिफनाथ माध्यमिक विद्यालय जवखेडे खालसा येथे २७ वर्षापासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव वाघ यांची प्रेरणा घेऊन भारत कांबळे सर दरवर्षी पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करत असतात. कांबळे सर यांच्याबरोबर यावर्षीच्या वारी सोहळ्यात हभप आबाजी महाराज आंधळे, हभप विठ्ठल महाराज मतकर व हभप भाऊसाहेब वाघ या भाविकांनी कार्तिकी वारीत सहभाग घेतला आहे.
