बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यात जर शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा नेता कोणी असेल तर ते म्हणजे शंकरराव गडाख. जे विरोधक एकमेकांचे न होता एकमेकांविरुद्ध उभे राहिले ते जनतेचे काय होणार. गडाख परिवाराने ज्यांना ज्यांना संधी दिली तेच आमचे कट्टर विरोधक झाले आहेत व गडाख साहेबांवर खालच्या पातळीवर बोलत असून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आता मशाल पेटली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार असून मंत्रीपद घेऊन तालुका सुजलाम सुफलाम करण्याचा ध्यास आमदार शंकरराव गडाख यांनी घेतला असून आम्हाला विरोधकावर बोलायचे नाही, परंतु तालुक्यात विकासाचे व्हिजन घेऊन चालायचे आहे, असे प्रतिपादन युवक नेते उदयन गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. या सभेनिमित्त गावात मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली असून नेवासा विधानसभा मतदारसंघ 221 तालुक्यातील निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडी कडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आमदार शंकरराव गडाख अधिकृत उमेदवार असून काल नेवासा येथे नारळ वाढवून मशाल हाती घेत त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. तालुक्यातील विविध ठिकाणी त्यांना प्रचारादरम्यान मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यानिमित्ताने देडगाव येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सुखदेव महाराज मुंगसे होते.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी आमदार शंकरराव गडाख यांच्या विकासाबद्दल माहिती देत देडगावकडून जास्तीत जास्त मतदान देऊन विजयाचा गुलाल आपल्यावर पडेल, अशी ग्वाही देत आमदार शंकरराव गडाख यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, माजी सभापती कारभारी चेडे, कडूभाऊ तांबे ,नवनाथ महाराज मुंगसे, कुंडलिक दादा कदम ,संभाजी मुंगसे, संतोष तांबे, महादेव पुंड, अशोक मुंगसे ,बाळासाहेब मुंगसे, बाबासाहेब मुंगसे, नारायण मुंगसे, श्रीकांत हिवाळे ,विजय हिवाळे, सत्यदान हिवाळे, कडुभाऊ दळवी, बंडू तांबे, जनार्धन देशमुख, रामेश्वर गोयकर ,लक्ष्मणराव गोयकर आदी तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
