पाथरवाला विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा २३ वर्षांनी भरला वर्ग 

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील कुकाणा ग्रामसेवा मंडळ संचलित पाथरवाला माध्यमिक विद्यालयाच्या सन २००२ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष संंस्कार वर्ग घेऊन स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिपावली सुट्टीचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले वर्गमित्र माजी विद्यार्थी – विद्यार्थींनी एकत्र येवून स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल २३ वर्षानंतर एकमेकांशी संवाद साधला. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद अनुभवयास मिळाला. प्रत्येकजण आपापल्या मित्राची आपुलकीने विचारपूस, विचाराची देवाण- घेवाण करत होता. सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचा व परिवाराचा परिचय करून देताना शाळेतील गमतीदार आणि काही अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले गुरुजणांकडून उत्तम ज्ञान व मित्र परिवाराची साथ मिळाली. कोरोनाने पैसा महत्वाचा नाही तर माणसे महत्वाची आहेत हे शिकवले. त्यामुळे यापुढे मैत्रीचे नाते कायम जपावे, आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना जीवनात यश मिळवले, पण यामागे आई – वडीलांचे कष्ट व शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी आयोजित स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सुनिल पंडित होते. तर प्रमुुख अतिथी म्हणून संभाजीनगर येथील न्यायालयाचे ॲड. हिंमतसिंह देशमुख, मुख्याध्यापक रमेश खाटीक, प्रा.मल्हारी खाटीक,  प्रा. दिपक खाटीक, अध्यापक अर्जुन लोंढे , अध्यापक चंद्रकांत गुंड, संदीप लिपणे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात
दिपप्रज्वलन व राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी हरिभाऊ पावसे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पुन्हा वर्ग भरून जुन्या आठवणींना उजाळा देत संस्काराचे धडे गिरवले.
याप्रसंगी नितीन फोपसे, संदीप थोरे, शरद गवळी, आप्पासाहेब थोरे, रविंद्र धावणे, ताराचंद थोरे, सिद्धेश्वर खाटीक, ज्ञानेश्वर कंठाळे ,गणेश खाटीक, सुरेश खाटीक , बापू घनवट, ज्ञानेश्वर खाटीक, सुनील खाटीक, सुनील फोपसे, गोरख गवळी, कल्याण खाटीक, देविदास गवळी, संदीप साळवे , हरिभाऊ पावसे, नितीन खाटीक, चंद्रकांत आढाव, अध्यापिका शितल थोरे , वंदना कुऱ्हाट, शितल मुळे, सविता घोडेचोर, मंगल होंडे, सुवर्णा कदम, जनाबाई कदम, मीना खाटीक, रंजना कुसारे, सुनिता मोहिते, मनीषा काळे, भारती पवार, उज्वला खाटीक, प्रियंका खाटीक, कांचन खाटीक आदी माजी विद्यार्थीनी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप थोरे यांनी केले. आभार नितीन फोपसे यांनी मानले.