विरोधक हे विकासकामांवर न बोलता एकमेकांवर टीका करत आहेत: गडाख 

राजकीय

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- विरोधक हे विकास कामावर न बोलता एकमेकांवर टीका करत आहेत, असे प्रतिपादन युवा नेते उदयन गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील माका येथे आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. गट-तट बाजूला ठेऊन विक्रमी मताधिक्य देऊन आमदार शंकरराव गडाख साहेबांना विधानसभेत पाठवायचे असा निर्धार यावेळी माका, पाचुंदा, महालक्ष्मी हिवरा येथील नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. माका येथे आज युवा नेते उदययन गडाख यांनी संवाद मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. उदयन गडाख म्हणाले, आमदार शंकरराव गडाख यांनी देडगाव, माका, महालक्ष्मी हिवरा, पाचुंदा गावामध्ये भरपूर प्रमाणात निधी दिला. पाणी, वीज याबाबतचे प्रश्न मार्गी लावले. तसेच प्रत्येक वाडीवस्तीवर जाणारे रस्ते करण्यात आले. अनेक लोकाभिमुख कामे झाली. यावेळी माका सोसायटीचे चेअरमन मल्हारी आखाडे, योगेश शिंदे, बळीराम काळे, नेवासा लॉर्यस कन्झ्यूमर सोसायटीचे चेअरमन अँड. गोकुळ भताने यांनी आपल्या मनोगतातून माका गावातील सर्वं कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून एकदिलाने काम करून गावातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले. यावेळी मुळा बँकेचे चेअरमन माणिक होंडे, लक्ष्मण पांढरे, खंडूभाउ लोंढे, रामदास घुले, जगन्नाथ घुले, देवीदास भुजबळ, एकनाथ जगताप, साहेबराव होंडे, बाळासाहेब गायके, एकनाथ भुजबळ, किसन पाटील भानगुडे, डॉ. केकाण, दिलिप शिंदे (गुरव), सतिष पटेकर, जाकीर पठाण, सुभाष गाडे,  नामदेव लाडके, आदिनाथ म्हस्के, दत्तात्रय पालवे, शहादेव लोंढे, बाबासाहेब कोकाटे, प्रल्हाद शेंडगे, दिगंबर शिंदे, गोवर्धन रुपनर, अण्णासाहेब केदार सतिष लोंढे, बालादित्य घुले आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माका गावचे उपसरपंच अनिल घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.