जनशक्ती (वृत्तसेवा)- गत पाच वर्षात माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून नेवासा तालुक्याचा अमुलाग्र विकास झालेला आहे. प्रत्येक भागातील विकासाचे अनेक प्रलंबित प्रश्न सुटल्याच्या नागरिकांमधून प्रतिक्रिया येत आहेत. बालाजी देडगाव व परिसरातही आमदार गडाख यांच्या माध्यमातून भरीव कामे झाली आहेत. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात व नंतरही तालुक्यात केलेली विकासकामे पाहता तालुक्यात जनता समाधानी असून येणाऱ्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी होणाऱ्या आमदारांमध्ये आमदार शंकरराव गडाख यांचा समावेश असेल, असा विश्वास बालाजी देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी व्यक्त केला.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे म्हणाले, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी मागील पाच वर्षात तालुक्याचा सर्वांगिण विकास केला आहे. तालुक्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार गडाख यांनी सर्वोतपरी प्रयत्न केले आहेत. तालुक्यातील विजेचे प्रश्न, पाट पाण्याचा प्रश्न, शिवरस्त्यांचे प्रश्न, विविध रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले. धार्मिक स्थळांचा विकास केला. अनेक गावात सभामंडपाची कामे पूर्ण झाली आहेत, तर अनेक कामे प्रगतीपधावर आहेत. आमदार गडाख यांनी तालुक्यातील नागरिकांचे अनेक मुलभूत प्रश्न सोडवले आहेत. तसेच माजी सभापती सुनिताताई गडाख यांनीही पंचायत समिती अध्यक्षपदाच्या काळात व बचत गटाच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामे घडवून आणली. त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी तसेच नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी बालाजी देडगाव व परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा आमदार शंकरराव गडाख यांनाच विधानसभेत पाठवावे, असे आवाहन सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले आहे.
