आमदार गडाख यांच्या प्रचारार्थ उद्या नेवासेत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार  

राजकीय

जनशक्ती (वृत्तसेवा)-  नेवासा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा उद्या गुरुवारी १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता नामदेवनगर, ज्ञानेश्वर कॉलेज जवळ, नेवासा येथे होणार आहे. आमदार गडाख यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून यावेळी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेना पक्षफुटीच्या काळात अपक्ष असूनही उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा दाखवत फुटणाऱ्या आमदारांसोबत न जाता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मूळ शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या परिवाराने त्यांचा मातोश्री निवासस्थानी सन्मान केला. तसेच शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नेवाशात येऊन आमदार शंकरराव गडाख यांनी दाखवलेल्या निष्ठेबद्दल कौतुक केले. तेव्हापासून आमदार शंकरराव गडाख यांच्यावर ठाकरे कुटुंबाचे विशेष प्रेम आहे. त्यामुळेच विधानसभा उमेदवारांच्या पहिल्याच यादीत आमदार गडाख यांचे नाव अग्रक्रमाने होते.