देडगाव येथे अनेक कार्यकर्त्यांचा आमदार शंकरराव गडाख गटात प्रवेश

राजकीय

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचारादरम्यान नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती येथे मोठी कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी बालाजी देडगाव व परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी सभापती सुनिताताई गडाख यांच्या उपस्थितीत शंकरराव गडाख गटात प्रवेश केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजीराव पाटील मुंगसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, दत्तूभाऊ काळे, कारभारी जावळे, आश्रुबा सानप, बाळू नागरे, मल्हारी आखाडे आदींनी आपले मनोगत व्यक्त करत आमदार शंकरराव गडाख साहेब यांच्या प्रचाराला शुभेच्छा दिल्या. यावेळी बालाजी देडगाव येथील महादेव कदम तसेच तेलकुडगाव येथील आंबादास शेंडगे, नवनाथ शेंडगे, शिवाजी शेंडगे, आजीनाथ शेंडगे, विठ्ठल शेंडगे, दत्तू शेंडगे, सोमनाथ शेंडगे व लहू दळे यांनी शंकरराव गडाख गटात जाहीर प्रवेश केला. माजी सभापती सुनीताताई गडाख व माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग व सुनिताताई गडाख यांनी आमदार शंकरराव गडाख यांना मताधिक्क्याने पुन्हा विधानसभेत पाठवा त्यामुळे आपल्या तालुक्याला पुन्हा मंत्रिपदाची संधी  द्यावी, आपलं एक मत महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देऊ शकते. आपण सुज्ञ मतदार असून विकासाला मत देऊन तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा व जास्तीत जास्त मतदान घडून आणा, अशी विनंती केली. पाचुंदा व माका परिसरातून आमदार शंकराव गडाख यांच्या प्रचार सभेची भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली होती. यामध्ये बहुसंख्य तरुणांनी सहभाग घेतला होता.यावेळी मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, माजी उपसभापती कारभारी चेडे , मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मण पांढरे, एकनाथराव जगताप, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, माजी सरपंच गोरक्षनाथ घुले, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, संतोष तांबे, बन्सीभाऊ गायके, मालोजीराव गटकळ , रमेश काळे , गोवर्धन काळे, अरुण घाडगे, काकासाहेब काळे, शंकरराव घोडेचोर, नामदेव अण्णा घोडेचोर, युवा नेते महेशराजे काळे, दिगंबर काळे, अमित भैय्या रासने, बाबासाहेब होंडे, रावसाहेब गायके, दादासाहेब एडके, सूर्यभान सोनवणे भाऊसाहेब, बंटी केदार, चंद्रभान कदम, नारायण वाघमोडे, योसेफ हिवाळे, बाबासाहेब मुंगसे, रामेश्वर गोयकर, राजू मुंगसे (टेलर), चांगदेव तांबे, देवसडे येथील घोडेचोर भाऊ ,अंबादास तांबे, सोपानराव तांबे , जनार्दन तांबे , कडूभाऊ तांबे, श्रीकांत हिवाळे, तुळशीराम तांबे ,बंडू तांबे, अशोक तांबे, रामनाथ तांबे, लक्ष्मणराव गोयकर, बाबुराव हिवाळे, रामा कोकरे, बाळासाहेब मुंगसे ,शिवाजी मुंगसे, निवृत्ती मुंगसे ,अशोकराव मुंगसे, एकनाथ भुजबळ, पिंटू भुजबळ, मा. चेअरमन साहेबराव होंडे, भरत होंडे, सोलाट मामा, देडगाव सोसायटीचे चेअरमन सागर बनसोडे, व्हा. चेअरमन जनार्धन देशमुख, गणेश ससे, बंडू बावधनकर , सारंगधर मुंगसे, विजय चेडे, भीमराज मुंगसे तसेच माका, पाचुंदा, तेलकुडगाव, मल हिवरा, देवसडा , देडगाव गणातील मतदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कचरू बाबुराव तांबे यांनी मानले.