देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधानदिन उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांची परिसरात प्रभातफेरी काढून शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच सामुहिक संविधान वाचन करण्यात आले. यानिमित्त शाळेत हस्ताक्षर, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब दळवी, दानियल दळवी, पोपट मुंगसे, बन्सीभाऊ मुंगसे, आनंद दळवी, उत्तम सकट, प्रकाश दळवी, प्रविण दळवी, अविनाश दळवी, अविनाश तांबे, येशुदास दळवी, ईश्वर भवार, गहिनीनाथ भवार, मयूर कोल्हे आदी पालकांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन मुख्याध्यापक अभिषेक घटमाळ यांनी केले. तर सहशिक्षिका मनिषा कांबळे यांनी आभार मानले.