बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पावधीत लौकिक मिळवलेल्या कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेच्या संचालिका मिना बनसोडे यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी शौर्य गायके व शौर्य नरवडे तसेच सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी संस्कृती लोंढे हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. सामाजिक प्रबोधन, अशपृष्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन स्रीयांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी या कार्यात मोलाची साथ दिली, असे प्रतिपादन संस्थेच्या संचालिका मिना बनसोडे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोनाली बर्फे, मनीषा बाचकर, जयश्री पाटेकर, सोनाली पवार यांनी परिश्रम घेतले.