बनसोडे इंग्लिश स्कूलने राबवला एक दिवस बाजाराचा उपक्रम

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पावधीत लौकिक मिळवलेल्या कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूलने एक दिवस बाजाराचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला .सदरची स्कूल नेहमीच विद्यार्थी हिताचे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असून स्कूल ने माका गावातील आठवडी बाजारात जाऊन स्वतः बाजार करण्याचा अनुभव घेतला .पालकांनीही सदर उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला.

या शाळेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असताना या एक दिवस बाजाराचा या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे व्यवहार कौशल्य विकसित व्हावीत, तसेच विद्यार्थ्यांना नाणी, नोटा यांचे योग्य आकलन व्हावे, वजन माप यांचे ज्ञान यावे, त्यांचे बर्गेनिंग स्किल डेव्हलप व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवला गेला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे यांनी दिली. सदर उपक्रम यशस्वितेसाठी संस्थेच्या संचालिका मिना बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले.