बालाजी देडगाव येथे नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विश्वविक्रम प्रस्थापित श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था विविध उपक्रम राबवते. यानिमित्ताने देडगाव शाखेमध्ये नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप सय्यद बाबा पुंड महाराज यांच्या हस्ते नागेबाबा प्रतिमेचे पूजन करून प्रकाशन सोहळा करण्यात आला. यावेळी प्रस्ताविकात संस्थेचे असिस्टंट जनरल मॅनेजर अनिल कदम यांनी संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये अन्नपूर्णा योजना, प्रेमाचा डबा तसेच हनुमान टाकळी येथील गोशाळा याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाप्रसंगी मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, कडूभाऊ तांबे, लक्ष्मण बनसोडे, चांगदेव तांबे, उपसरपंच दत्त पाटील मुंगसे, एकनाथ बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार इनुस पठाण, भाऊराव मुंगसे, मधुकर शिरसागर, श्रीकांत हिवाळे, बाबासाहेब होंडे, वसंत नांगरे, प्रशांत फुलारी, देवराव मुंगसे, रवींद्र शेटे, दत्तू तांबे सभासद खातेदार कोऑर्डिनेटर नवनाथ वंजारी, कॅशियर राहुल मुंगसे, क्लर्क योगेश भारती उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शाखाधिकारी पांडुरंग एडके यांनी मानले.