तक्षशिला स्कुलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने जिंकली उपस्थितांची मने  

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- बालाजी देडगाव येथील तक्षशिला जुनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूलच्या सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन इंग्रजी व कन्नड साहित्याचे ख्यातनाम लेखक प्रा.डॉ. कमलाकर भट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे होते. यावेळी बोलताना डॉ. भट म्हणाले की, ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमामुळे शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारे उपक्रम या शाळांमधून राबवले जातात. त्यामुळे भविष्यातील जागतिक व्यवहाराचे दरवाजे आता थेट गावातील मुलांना उघडले जातील. त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे. अशी गरज तक्षशिला पूर्ण करत आहे. याप्रसंगी कृषी अधिकारी संजय कदम, मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय कदम, ओम शांती परिवाराचे अनिल गडाख, संचालिका शुभांगी कदम, सागर बनसोडे, पत्रकार युनुस पठाण, सौ साजी भट, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रामायण व महाभारतातील प्रसंगांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यरोहन प्रसंग लाईव्ह पाहताना प्रेक्षक भारावून गेले होते. अनेक मुलांनी विविध प्रकारच्या वेशभूषा सादर करून पारंपारिक नृत्यासह आधुनिक काळातील तंत्रज्ञानाची ओळख आपल्या कलाकृतीतून करून दिली. ग्लोरियस डान्स अकॅडमी नाशिकचे राहुल माने यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले. सदर कार्यक्रमासाठी भास्कर गोयकर, प्रेम कुमार गोयकर, सचिन मिसाळ, अशोक पवार, गणेश नांगरे, मनीषा आवताडे, मयुरी पवार, कल्पना पवार, पुनम चिमखडे, आकांक्षा तांबे, मोहिनी कर्डिले, सविता पिसाळ, ज्योती मुंगसे, अर्चना मडके, अमृता शिंदे, स्वाती लोंढे, वर्षा कचरे, सुरभी अवताडे आदींनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून उपस्थितांनी बक्षिसांची लयलूट केली. कार्यक्रमांचे प्रास्ताविक उपप्राचार्य संदीप खाटीक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते महेश काळे यांनी केले. साई कदम, ज्योती खंडागळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्राचार्य विठ्ठल कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.