जनशक्ती (वृत्तसेवा) – स्नेहालय अहिल्यानगर येथे १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या नवभारत उल्लास मेळाव्यात नेवासा तालुक्यातील शिक्षकांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. या मेळाव्यात साक्षरतेचा देवीचा गोंधळ सुमित्रा सजलाने यांनी सादर केला तर त्यांना राहुल पालवे यांनी साथसंगत केली. याप्रसंगी सादर केलेल्या विविध स्टॉलमध्ये भाऊसाहेब चांडे, अभिषेक घटमाळ यांनी शैक्षणिक कायद्यांची उपस्थितांना माहिती दिली.
याबाबत गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, विस्तार अधिकारी रुक्साना शेख, केंद्रप्रमुख कमल लाटे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे जिल्हा शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले.
