कुकाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुल भैय्या शेख दिली आहे.

कुकाणा येथील साई श्रद्धा लॉन्स येथे रविवार दिनांक २९ डिसेंबर रोजी या जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेच्या सेवेसाठी नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरीता डोल प्रकरण, रेशन कार्ड समस्या, लाडकी बहिण योजना समस्या, बँक लोन समस्या, सर्व सरकारी योजना मोफत लाभ, पिंक रिक्षा योजना, बचत गट योजना, आधार कार्ड दुरुस्ती, कामगार योजना, विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेवासा विधानसभेच्या वतीने आयोजीत जनता दरबार पुन्हा सुरू करत आह. या जनता दरबारासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुल भैय्या शेख यांनी केली आहे.