बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- पंचगंगा उद्योग समूह संचलित पंचगंगा शुगर पाॅवर प्रा.लि.प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच प्रमुख मान्यवर व संत- महंताच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त या प्रकल्पाचे संस्थापक प्रभाकर पाटील शिंदे काका यांचा तेलकुडगाव ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शेतकरी बंधू यांच्या वतीने सन्मान करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. महालगाव (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे नुकताच प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न झाला.
यावेळी तेलकुडगाव येथील सरपंच सतिशराव काळे पाटील, माजी सरपंच बालकनाथ काळे, साईनाथराव काळे, रेवन्नाथ काळे प्रगतशील शेतकरी, प्रसाद घोडेचोर प्रगतशील शेतकरी, काकासाहेब काळे मा.चेअरमन, संजय घोडेचोर महायुती कार्यकर्ते, थोरात आदिनाथ, गौतम काळे, दत्तात्रय काळे, नाथा घोडेचोर, नामदेव म्हस्के, सोपान शेंडगे, कमलेश काळे, बंडूतात्या घोडेचोर, बाळासाहेब म्हस्के, सिताराम काळे, अर्जुन कर्डिले, गोरक काळे, योगेश गटकळ, शिवाजी चक्रनारायन आदी शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने पंचगंगा उद्योग समूह संस्थापक प्रभाकर पाटील शिंदे काका यांचा सन्मान करुन शुभेच्छा दिल्या.