सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविकांनी घेतले नाथांचे दर्शन 

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- लाखो भाविकांनी सोमवती अमावस्येची पर्वणी साधत पाथर्डी तालुक्यातील धार्मिक स्थळांवर लाखो नाथभक्तांनी दर्शन घेतले. भाविकांनी मढी येथील कानिफनाथ, मायंबा येथील मच्छिंद्रनाथ, मोहटा येथील मोहाटादेवी, धामणगाव येथील जगदंबा माता आदी मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. अमावस्येच्या विशेष पर्वणीला राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक तालुक्यात दाखल झाले होते. यामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊन काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. चालू वर्षातील शेवटची अमावस्या व नवीन वर्षाचे स्वागत यानिमित्ताने उच्चांकी गर्दी भाविकांची देवस्थानस्थळी झाली होती. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विशेष महापूजा तर मोहटा देवस्थान या ठिकाणी गोड महाप्रसादाचे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आयोजन केले गेले आहे. पुढील दोन दिवस या मंदिरात गर्दी राहण्याची शक्यता आहे.