नेवासे (प्रतिनिधी)- नेवासे प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून नेवासे येथे सोमवारी (दि.६) पत्रकार दिनाच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे शहरातील पत्रकार शंकर नाबदे, राजकिय पटलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सचिन देसरडा व विधीतज्ञ, समाज भूषण स्व.ऍड. के.एच.वाखुरे (मरणोत्तर) असे पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी दिली आहे.
नेवासे येथील औदुंबर चौकात सोमवार दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासकर यांच्या शुभहस्ते तर संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या आयुष्याचा प्रवास हा जिद्दीचा व सातत्याचा असतो म्हणूनच तालुक्यातील पत्रकार बांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रेस क्लबचे सदस्य अशोक डहाळे, सुधीर चव्हाण, कैलास शिंदे, सुहास पठाडे, मकरंद देशपांडे, शाम मापारी, रमेश शिंदे, नानासाहेब पवार, पवन गरुड, अभिषेक गाडेकर यांनी केले आहे.
