बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पावधीत लौकिक मिळवलेल्या कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूल माका येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंफाबाई सानप होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे, शीतल बजांगे, राधाबाई आघाव, अंकुश लोंढे, भगवान सानप, राजेंद्र सांगळे, राजेंद्र आघाव, अंबादास पालवे उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान आहे. तत्कालीन व्यवस्थेचा विरोध झुगारून त्यांनी स्री शिक्षणाची चळवळ उभी केली. म्हणूनच आज त्यांची जयंती बालिका दिवस म्हणून संपूर्ण भारतभर उत्साहात साजरी करण्यात येते, असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे यांनी केले. दरम्यान आलेल्या पाहुण्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंच्या कार्याचा लेखजोखा विद्यार्थ्यांसमोर मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बाचकर यांनी केले. आभार सोनाली बर्फे यांनी मानले.