बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निवृत्ती मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेल्या अहोरात्र परिश्रमाचे उदाहरणांच्या साहाय्याने मार्मिक शब्दांत मार्गदर्शन केले. तसेच आजच्या पुढीतील मुलींच्या समोर असणारी आव्हाने व त्या आव्हानांना कसे सामोरे जावे यासंदर्भात कानमंत्र दिला. तसेच अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांनी सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या विचारांचा अंगीकार कसा करावा, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दत्ता कोकाटे यांनी केले. तर सूत्रसंचालन वैष्णवी लोंढे हिने केले. डॉ. अमोल दहातोंडे यांच्या मार्गदर्शनखाली कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रा. शाहबाज सय्यद, प्रा. अजित हरिश्चंद्रे, प्रा. भक्ती बजांगे व प्रा. प्राजक्ता गायके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रा. मंदार कुलकर्णी यांनी मानले.
