बालाजी देडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील श्री संत रोहिदास महाराज मंदिर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी देवस्थानचे माजी अध्यक्ष कुंडलिक कदम होते. सरपंच चंद्रकांत मुंगसे, बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, सेवा संस्थेचे चेअरमन सागर बनसोडे, युवा नेते निलेश कोकरे, युवक नेते मच्छिंद्र मुंगसे, निवृत्ती तांबे, कचरु तांबे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, चांगदेव तांबे, कचरू तांबे, माजी चेअरमन संतोष तांबे, संभाजी काजळे, राजाराम तांबे, संजय मुंगसे (जय हरी), रामदास एडके, शंकर शिरसागर, अरुण दळवी, आसाराम पाटील मुंगसे, राजाराम तांबे, बबन तांबे, बंडू तांबे, पांडुरंग एडके, तांदळे देवा, उत्तम तांबे, संपत ससाणे, अक्षय तिडके, बाबासाहेब तांबे, भैय्या पठाण, रामनाथ तांबे, बाळासाहेब वांढेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे यांनी केले. सुत्रसंचालन पत्रकार इंनुस पठाण यांनी केले. शेवटी संत रोहिदास महाराज देवस्थानचे अध्यक्ष पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी चांगदेव तांबे यांनी उपस्थितांसाठी अल्पोहाराचे नियोजन केले होते.