बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादकांची आणखी एक चिंता मिटली आहे. आता नेवासा तालुक्यातील कोणत्याही बँकेत किंवा कोणत्याही विविध कार्यकारी सोसायटीमध्ये पंचगंगा शुगर अँड पावर लिमिटेड महालगाव या कारखान्यास नोंद असलेल्या उसास नोंद सर्टिफिकेटवर शेती कर्ज मिळणारस आहे. यासंदर्भात अहमदनगर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेने सर्क्युलर काढून कळवण्यात आले आहे. आता सर्व बँका सोसायटीमध्ये पंचगंगा शुगर अँड पावर या साखर कारखान्यात नोंदवलेल्या उसाच्या सर्टिफिकेटवर शेती कर्ज मिळणार असल्याचे नुकतेच जिल्हा बँकेकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांची ‘पंचगंगा’चे अध्यक्ष प्रभाकरजी शिंदे यांनी नुकतीच भेट घेऊन याविषयी माहिती दिली होती. त्यानंतर लगेचच आदेश काढण्यात आले. या भेटीप्रसंगी राजू मते, सतीश कर्डिले, प्रताप चिंधे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
