अब्दुलभैय्या शेख यांनी विविध विकासकामांच्या संदर्भात घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्याचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील विविध विकास कामांवरती चर्चा केली. त्याचबरोबर नेवासा तालुक्यातील काही पत्रकार बांधवांनी सूचना केल्या होत्या की, नेवाश्यातील पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवन उभारण्यात याव, अशी मागणी पत्रकार संघटनेच्या वतीने केली, त्याचे देखील पत्र अजितदादांना यावेळी अब्दुलभैय्या शेख यांनी दिले. येणाऱ्या काळात लवकरच यावर निर्णय घेवून आपणांस विकासकामांसाठी मदत करू, असे यावेळी अजितदादा पवार यांनी सांगितले. तसेच राज्यभरातील 60 रुग्ण हे विलक्षणीय आजाराने ग्रासले असून त्यांचा प्रती रूग्ण खर्च सुमारे एक कोटी पेक्षा जास्त आहे. एकूण 60 कोटीपेक्षा जास्त खर्च असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी अजितदादांना भेटून परिस्थिती सांगितली. त्यावर अजितदादांनी लगेच स्विय सहायक मुसळे साहेब यांच्याशी चर्चा करुन सदरील रुग्णांना मदत करण्याचे आश्वासन दिले. कामाचा माणूस म्हणून सन्मानिय दादांकडे पाहिले जाते. गोरगरिबांसाठी नेहमींच तत्पर असतात, आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातूनही मदत या पूर्वीही अनेकदा आदरणीय दादांनी केली आणि यापुढेही करत राहतील. ज्ञानेश्वर मंदिराच्या विकासासाठी अजितदादांच्या मागच्या वर्षीच्या कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयाला चालना देऊन लवकरात लवकर पुढचा निर्णय घेऊ, असा शब्द दादांनी यावेळी दिला. तसेच युवा प्रशिक्षण योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी जॉईन करण्यात आले होते, त्यांच्या भविष्याचा विचार देखील आपण महायुती सरकार करणार असल्याचे सांगितले. तसेच बँकेच्या संदर्भातल्या अडचणी व जनता दरबारामध्ये आपण उपस्थित केलेले अनेक प्रश्नांसाठी दादा खंबीरपणे आपल्यासोबत आहेत, पक्ष आपल्यासोबत आहे. येणाऱ्या काळात जी काही मदत करता येईल ती करू, असा विश्वास अजितदादांनी यावेळी अब्दुलभैय्या शेख यांना दिला.