महालक्ष्मी हिवरे येथे सत्संग सोहळ्याचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत खंडोबा मंदिर शेजारी सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचे परम शिष्य बहन पल्लवीताई तोरमल जी (संगमनेर) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सोनई ब्रांच प्रमुख विठ्ठलजी खाडे व समस्त साधसंगत महालक्ष्मी हिवरे यांनी केले आहे. साधसंगत नंतर सर्वांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.