चाइल्ड करिअर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडा महोत्सवास प्रारंभ

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील गुणवत्ता संस्कार व संस्कृती जपणारी व आयएसओ मानांकन प्राप्त असलेली नामांकित जाईल करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक आंतरशालेय क्रीडा महोत्सवास सुरुवात झाली.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप अशोक महाराज साळुंखे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दिघी सोसायटीचे चेअरमन दादासाहेब निकम, संस्थेचे विश्वस्त अंबादास गोरे,संदीप साळुंखे, मेजर निलेश भक्त, संदीप निकम ,भास्कर गोरे, चेतन फिरोदिया, महादेव गोरे, पप्पू सिंग परदेशी, भारत पंडित , मोहसीन कादरी, रियाज कादरी, रवींद्र गावडे, भारत पंडित, श्रीमती सभा पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. सर सलामत तो पगडी पचास या उक्तीप्रमाणे आपली आरोग्य उत्तम असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी खेळ व व्यायाम महत्त्वाचा आहे. बाल वयातच खेळाचे व व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे, म्हणून दरवर्षी शाळा आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करत असते, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे यांनी केले. दरम्यान, खेळामुळे एकता, सहकार्य, संघभावना, नेतृत्व या गुणांचा विकास होतो, आरोग्य उत्तम राहते, म्हणून खेळ खेळले पाहिजे, असे मत प्राचार्य रवींद्र गावडे यांनी व्यक्त केले. सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य रवींद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्टाफ परिश्रम घेत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहरुख सय्यद यांनी केले. कैलास तांबे यांनी आभार मानले.