बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बाळासाहेब ज्ञानदेव मुंगसे यांचे बिनविरोध निवड करण्यात आली. ठरल्याप्रमाणे केशर महादेव पुंड यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यासी अधिकारी सरपंच चंद्रकांत मुंगसे होते. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी एस.जी. उल्हारे यांनी काम पाहिले. उपसरपंच पदासाठी बाळासाहेब मुंगसे यांच्या नावाची सूचना पोपट विठ्ठल मुंगसे यांनी मांडली.
यावेळी माजी सरपंच बाजीराव मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी चेअरमन कडुभाऊ तांबे, ज्ञानेश्वरचे संचालक जनार्धन कदम, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, सुभाष मुंगसे ग्रामपंचायत सदस्य केशर महादेव पुंड, पोपट विठ्ठल मुंगसे, अलका कानिफनाथ गोयकर, मीनाक्षी लक्ष्मण मुंगसे, अंबादास काशिनाथ तांबे, बाळासाहेब ज्ञानदेव मुंगसे, सुषमा आनंद दळवी, जालिंदर एकनाथ खांडे, राधिका अनिकेत मुथ्था, मार्था विश्वास हिवाळे, आविनाश भाऊसाहेब कदम, उषा संजय गायकवाड, रत्नमाला लालबहादूर कोकरे, अभिजीत भाऊसाहेब ससाणे, अर्जुन लक्ष्मण कोकरे, सुनील मुथ्था, अशोक मुंगसे, बन्सी मुंगसे, शिवाजी मुंगसे, विश्वास हिवाळे, महादेव पुंड, कानिफनाथ गोयकर, विशाल मुंगसे, राजू मुंगसे, आविनाश दळवी, पत्रकार बन्सीभाऊ एडके, किशोर मुंगसे, अरुण वांढेकर, सतीश मुथ्था, शांताराम बावधनकर, राजेंद्र जयवंत मुंगसे, गोकुळ मुंगसे, बंडू मुंगसे, मोहन मुंगसे, मच्छिंद्र मुंगसे, रामदास मुंगसे, गणेश मुंगसे, देविदास मुंगसे, गोरक्ष मुंगसे, गोरख पंडित, सारंगधर मुंगसे, संजय मुंगसे, नारायण खरात, सुभाष सोनवणे, नवनाथ मुंगसे, नारायण मुंगसे, सूर्यभान सोनवणे भाऊसाहेब, राजाराम मुंगसे, मारुती कुटे, अशोक कुटे, राजू हिवाळे, सत्यदान हिवाळे,
प्रेमचंद हिवाळे, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश तांबे, बाळासाहेब म्हस्के, किरण मुंगसे, संजू कुटे आदी उपस्थित होते. निवडीनंतर बाळासाहेब मुंगसे यांचा विविध संघटनांच्या वतीने सन्मान करण्यात आला. शेवटी ग्रामविकास अधिकारी एस. जी. उल्हारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.