बालाजी देडगाव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, अहिल्याबाई होळकर विद्यालय व जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळांवर 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  देडगाव ग्रामपंचायत येथे सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, माजी सरपंच  बाजीराव पाटील मुंगसे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, मंडल अधिकारी सुनील खंडागळे, तलाठी भाऊसाहेब बालाजी मलदोडे, ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे, डॉ. अजित गवळी, कृषी अधिकारी गोरक्षनाथ काळे, मेजर संजय काळे, मेजर सोमनाथ मुंगसे, मेजर दत्तात्रय कुटे, सुनीलशेठ मुथ्था, कडूभाऊ दळवी, महादेव पुंड, बावधनकर मेजर, संपत ससाणे, अरुण वांढेकर, हरिभाऊ मुंगसे देशमुख, पत्रकार युनुस पठाण, बाळासाहेब म्हस्के, संजू कुटे, किरण मुंगसे, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा सेविका, आरोग्य सेविका आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन केले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे स्वागत ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांनी केले. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वतीने जय जवान जय किसान, भारत माता की जय, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो अशा घोषणा देत गावभर प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेच्या परिसरात सडा रांगोळी करत भव्य सजावट करण्यात आली होती. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आलेल्या मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोसले सर यांनी करत विविध उपक्रमांचे आयोजन केले. शाळेत सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या शुभहस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ध्वजाला सलामी दिली. यावेळी विविध स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तर विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. अशा अनेक उपक्रमांनी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बन्सी पाटील मुंगसे, व्यवसायिक संघटनेचे किशोर मुंगसे, युवा नेते निलेश कोकरे, आकाश चेडे, बळीराज्य संघटनेचे मच्छिंद्र मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, मधुकर देवा तांदळे, अन्वर सय्यद, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत ससाणे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, गोरक्षनाथ नांगरे गुरुजी, पत्रकार युनूस पठाण, भगवान मुंगसे, भिमराज मुंगसे, नागेबाबा मल्टीस्टेटचे पांडुरंग एडके आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजासत्ताक दिन सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी भाऊसाहेब सावंत सर, बथूवेल डी .हिवाळे, दत्तात्रय धामणे, करंडे मॅडम, श्रीमती कदम मॅडम, आदी शिक्षकांनी कष्ट घेत सहकार्य केले. तर विकास सेवा सहकारी सोसायटीच्या व दिलदार सय्यद यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.